Ad will apear here
Next
कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी उत्सव साजरा


रत्नागिरी :
भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शुक्रवारी (२३ ऑगस्ट) गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण, राधेच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बालगोपाळांनी सुरेख नृत्ये सादर केली. ‘आला रे आला गोविंदा आला,’ ‘गोविंदा रे गोपाळा’ असा गजर मुलांनी केला.



सुरुवातीला मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी श्रीकृष्णाचे पूजन केले. या वेळी बियाणी बालमंदिरच्या माजी मुख्याध्यापिका शुभांगी भावे, पालक प्रतिनिधी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महिला पालक प्रतिनिधींच्या सहकार्यातून विविध फळांचा प्रसाद बनवण्यात आला. दहीहंडीची सजावट पुरुष पालकांनी केली. 

दर वर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला सर्व पालकांचे सहकार्य लाभले. त्यानंतर कृष्णगीतांवर बालगोपाळांनी फेर धरला. पहिली ते चौथीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांनी आठ गीतांवर नृत्य सादर केले. नृत्य करताना विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. दोन गाणी सुरू असताना पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे मुलांचा उत्साह वाढला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या थरावर हंडी फोडली आणि जल्लोष केला.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZRICD
Similar Posts
आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी उत्साहात रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात एक सप्टेंबर २०१८ रोजी दहीहंडीचा सण बालगोविंदांनी उत्साहात साजरा केला. मुला-मुलींनी विविध कृष्णगीतांवर फेर धरून नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली.
आगाशे विद्यामंदिरात योगदिन साजरा रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी प्राणायाम व विविध आसने केली. या वेळी नगरसेविका मानसी करमरकर, पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून रत्नागिरी : पाच ते आठ थरांपर्यंतच्या मोठमोठ्या हंड्या रत्नागिरीसारख्या शहरात होऊ लागल्या आहेत; मात्र राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिरात साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी आजच्या आधुनिक युगातही टिकून आहे. मंदिरातील भोवत्या, पारंपरिक कृष्णनृत्य आणि तिसऱ्या थरावर हंडी फोडायची, विठ्ठल-रुक्मिणीला
अभ्यंकर बालकमंदिरमध्ये दहीहंडी उत्सव साजरा रत्नागिरी : आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरमध्ये शुक्रवारी (२३ ऑगस्ट) दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कृष्ण व राधेच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बालगोपाळांनी ‘गोविंदा रे गोपाळा’ गीतावर नृत्य सादर केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language